spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedटोका येथे सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिव भक्तांना केळी फराळाचे वाटप

टोका येथे सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिव भक्तांना केळी फराळाचे वाटप

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील टोका येथे पुरातन महिमा असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात  श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या हजारो शिव भक्तांना केळी फराळाचे व पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले.नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते केळी व फराळ वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
      यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सिद्धेश्वर बहु उद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतवन खंडागळे, संस्थेचे विश्वस्त माजी सरपंच वसंतराव डावखर,सुनील बाकलीवाल,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संतोष फिरोदिया, टोका गावचे माजी सरपंच भारत गवळी,हॉटेल उद्योजक सुभाष दिघे पाटील,दीपक आगळे,संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण,कडूबाळ रासने, अमित सावंत, उमेश लहारे,युवा उद्योजक शुभम उगले,काकासाहेब खंडागळे,दीपक आव्हाळे,माजी सरपंच राहुल लकारे, राजेंद्र कदम,भगवान कोरडे,रविंद्र अहिरे,नितीन भालेराव उपस्थित होते.
                  यावेळी उपस्थित भाविकांना उपस्थित मान्यवर व संस्थेच्या विश्वस्त मंडळींच्या हस्ते केळी, वेफर्स,पाणी पाऊचचे वाटप दर्शनासाठी आलेल्या भाविकांना करण्यात आले.यावेळी आलेल्या मान्यवरांचे सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी स्वागत करून सत्कार केला उपक्रमाचे हे दुसरे वर्षे असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
           पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.जागृत असलेल्या पुरातन सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात हजारो भाविकांना केळी फराळ वाटण्याच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी पंचक्रोशीतील विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
35.2 ° C
35.2 °
35.2 °
23 %
3.5kmh
2 %
Fri
36 °
Sat
36 °
Sun
36 °
Mon
34 °
Tue
34 °

Most Popular

error: Content is protected !!