नेवासा प्रतिनिधी -:
नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९७ वी शिवजयंती मराठा सुकानु समितीच्या वतीने व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली
.प्रथमत: श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजा करण्यात आली
यावेळी मक्तापुर गावाचे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे,मराठा सुकानु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,प्रिन्स दरबारचे संपादक बादल परदेशी,शिवसेना शिंदे गटाचे मनोज झगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना करण्यात आली.
यावेळी कु.वेदिका लक्ष्मण बर्डे,कु.दिव्या गणेश झगरे,कु.गायत्री जामदार या चिमुकल्या मुलींनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रपर आपल्या भावना व्यक्त केया,यावेळी तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले व छत्रपती राजे यांनी सर्वांना सारखा न्याय दिला,यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्या पाहिजे.
यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पी.आय.श्री.महेश पाटील साहेब यांनी या श्री छत्रपती शिवजयंतीला धावती भेट दिली,यावेळी महेश पाटील साहेब म्हटले की सर्वांनी शिवजयंती थाटामाटात साजरी करा कायद्याचं पालन करा,कारण कायदा हा सर्वांसाठी आहे आपण सर्वांनी एकत्र शिवजयंती केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद,गणेश भाऊ यांनी मला कार्यक्रमला आमंत्रण दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद असे नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांनी म्हटले.
मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,विर एकलव्य यांनी अखंड भारत देशासाठी महान कार्य केले आहे,याचाच आदर्श घेऊन मक्तापुर गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि मक्तापूर गावामध्ये भव्यदिव्य चौक उभे राहिले पाहिजे गावात सर्व एकत्र आल्याने गावाचा विकास होईल तरुणांनी आपले राजे श्री छत्रपतींचा आदर्श घेतला पाहिजे,व्यसनमुक्त झालं पाहिजे, तसेच महिलावरील अत्याचार थांबले पाहिजे या महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये चिमुकल्या मुलांवर होणारे अन्याय व अत्याचार या गंभीर घटना थांबण्याची गरज आहे अशा भावना गणेश झगरे यांनी मांडल्या
यावेळी उपस्थिती तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, सभापती रावसाहेब कांगुणे,मराठा सुकानु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,प्रिन्स दरबार चे संपादक बादल परदेशी,संपादक आबासाहेब शिरसाठ कल्याण कांगुणे,एकलव्य संघटनेचे नेते अविनाश गोरक्षनाथ बर्डे,आजिनाथ सुभाष बर्डे ,राहुल जामदार अनिल कांगुणे ,देवदान साळवे ,मनोज झगरे,ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे,अशोक साळवे,तन्मय पांडागळे,गोरक्षनाथ बर्डे,सुभाष बर्डे प्रगतशिल शेतकरी तुकाराम बर्डे,अरुण कांगुणे,लक्ष्मण बर्डे,अमोल भागवत,सुरेश खैरे,दत्तात्रय बर्डे,आजिनाथ झगरे,आजिनाथ नानासाहेब जामदार,जोएल साळवे,अमोल सातपुते,मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारे,मजनू शेख,नितीन बर्डे,गोरक्षनाथ नवघरे,प्रदीप साळवे,सचिन गायकवाड ,योगेश कांगुणे ,दीपक बर्डे ,दीपक शिंदे ,रोहित जामदार,तन्मय पांडागळे,प्रकाश माणिक साळवे,ज्ञानेश्वर गोरक्षनाथ बर्डे आदी मक्तापूर ग्रामस्थ व शिवभक्त,घटनापती भीमशक्ती संघटना,विर एकलव्य संघटनेचे सन्मांननीय सदस्य यावेळी उपस्थित होते

