spot_img
spot_img
Homeशैक्षणिकसाहित्यभाषा गौरव दिनानिमित्त महानुभाव ,नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाच्या परंपराचे स्मरण -...

भाषा गौरव दिनानिमित्त महानुभाव ,नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाच्या परंपराचे स्मरण – डॉक्टर करणसिह घुले

नेवासा

मराठी भाषेचे आद्यग्रंथ ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र यांचे पूजन करून नेवासा नगरपंचायतीमध्ये भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


नेवासा शहर व पंचक्रोशी ही मराठी भाषेचे उगमस्थान मानली जाते. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी नेवासा शहरातील लाडमोड परिसरात सुमारे सहा महिने वास्तव्य केले होते. त्या काळात त्यांनी येथे सहावी दिवाळी साजरी करत अनुयायांना उपदेश केला आणि काही लिळा येथेच रचल्या. त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी याच भूमीत ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ या प्राकृत ग्रंथांची निर्मिती करून मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून दिले.


नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या हस्ते दोन्ही संतश्रेष्ठांच्या प्रतिमांचे तसेच ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. घुले यांनी नेवासा हे नाथ संप्रदाय, महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय यांच्या अनोख्या संगमाचे केंद्र असल्याचे सांगून, भाषा गौरव दिनानिमित्त या सर्व परंपरांचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.


सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांनीही ग्रंथ व प्रतिमा पूजन करून मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमास मुख्याधिकारी गटनेते जितेंद्र कुर्हे निखिल फाराटे, कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे, ,महेश लोखंडे, प्रवीण आप्पा सरोदे, संदीप सरकाळे, अंकुश म्हस्के, दिनेश व्यवहारे अनिल शिंदे आबा तोगे, विकास चव्हाण, संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब गायकवाड, अनिल सोनवणे, पत्रकार मकरंद देशपांडे,यांसह नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
22.4 ° C
22.4 °
22.4 °
44 %
1.6kmh
0 %
Sun
34 °
Mon
37 °
Tue
38 °
Wed
38 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!