spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedस्त्री शक्तीच्या उद्धारासाठी आई जगदंबेची आरती करून महिला दिन साजरा,महिला स्वच्छता कामगारांना...

स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी आई जगदंबेची आरती करून महिला दिन साजरा,महिला स्वच्छता कामगारांना साडयांचे वाटप….

कुलस्वामिनी भजनी मंडळाचा अभिनव उपक्रम……

नेवासा(प्रतिनिधी)

जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी आई जगदंबेची आरती करून तिच्या उद्धारासाठी प्रार्थना करत नेवासा येथील कुलस्वामिनी भजनी मंडळाच्या वतीने साकडे घालण्यात आले तसेच महिला सफाई कामगारांना साडयांचे वाटप करून त्यांचा शाल ओटी भरून सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम ही कुलस्वामिनी भजनी मंडळाच्या वतीने राबविण्यात आला.
               नेवासा येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका व देवी भागवत कथाकार हभप सौ.साधनाताई मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सतीश मुळे सर यांच्या प्रेरणेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवी तुळजा भवानी मंदिराच्या सभामंडपात मंगळवारी राबविण्यात आला.यावेळी आलेल्या सर्व भजनी मंडळाच्या महिला सदस्यांनी आई जगदंबेची भजने गायली.


         यावेळी नगरपंचायतमध्ये पहाटेच उठून रस्त्याची स्वच्छता करणाऱ्या महिला कामगारांचा सन्मान उपस्थित महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते साडीचोळी देऊन त्यांची ओटी भरून शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.नगरपंचायत महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाप्रमाणेचे स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे म्हणून केलेल्या या सन्मानाने स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला असल्याचे समाधान आम्हाला मिळाले असल्याचे कुलस्वामिनी भजनी मंडळाच्या मार्गदर्शक सौ.साधनाताई मुळे मॅडम यांनी यावेळी बोलताना सांगितले.


    यावेळी सामाजिक कार्यात योगदान देणारे वृक्ष मित्र अमृत फिरोदिया,सतीश मुळे सर यांचा सन्मान दुर्गादेवी मंदिर व्यवस्थापक पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.


     यावेळी कुलस्वामिनी भजनी मंडळाच्या सदस्या सौ.साधनाताई मुळे,श्रीमती कावेरीताई मापारी,सौ.सरीता जोशी,सौ.मोहीनी रासने,सौ.स्मीता करंडे,सौ.पुजाताई शर्मा,नंदाताई गायकवाड,सौ संगिता चव्हाण,सौ, छायाताई कोकाटे,दुर्गादेवी महिला मंडळाच्या मार्गदर्शक सौ. मिनाताई पठाडे यांच्या हस्ते आई जगदंबेचा जयघोष करत आरती करण्यात आली.उपस्थित महिला भाविकांना प्रसादाचे वाटप करत कुलस्वामिनी भजनी मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात आला

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
26 ° C
26 °
26 °
19 %
2kmh
0 %
Wed
38 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
39 °
Sun
35 °

Most Popular

error: Content is protected !!