श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री गुरुमाऊली सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देवगड परिसरासह संपूर्ण वारकरी संप्रदाय व भक्तपरिवारावर शोककळा पसरली.

सकाळपासूनच श्रीक्षेत्र देवगड येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. अखंड भजन, नामस्मरण आणि भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती. अंतदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई विखे राजश्रीताई घुले माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे तसेच आमदार विठ्ठलराव लंघे प्रांत अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय बिरादार पंचगंगाचे प्रभाकर शिंदे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले ,एडवोकेट सुनील चावरे , बजरंग विधाटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
सायंकाळी साडेचार वाजता देवगड संस्थान परिसरातील सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली नव्याने उभारलेल्या भोजन कक्षेसमोर हजारो भाविकांच्या अश्रुपूर्ण उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकमग्न वातावरणात ‘गुरुमाऊलींना’ अखेरचा निरोप देण्यात आला आणि त्या पंचतत्वात विलीन झाल्या. त्या क्षणी संपूर्ण परिसर दुःखाने भारावून गेला होता.
-सायंकाळी साडेसहाच्या सूर्यास्ताच्या मुहूर्तावर भास्करगिरी महाराज यांची बंधू मधुकर बाबा पेसोडे यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला पुजाविधी मध्ये महंत श्री भास्करगिरी बाबा,उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज सहभागी झाले यावेळी रामभाऊ काटकर व शरद काटकर तसेच गणेश गुरु यांनी पूजा विधी सांगितला
त्यांच्या पश्चात ह.भ.प. भास्करगिरी महाराज, मधुकर पेसोडे हे दोन पुत्र तसेच कमलबाई रायपुरे ही कन्या असा परिवार आहे. भास्करगिरी महाराजांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यामागे मातोश्री सरुबाई यांचे संस्कार, त्याग आणि आशीर्वाद यांचा मोठा वाटा होता. साधी राहणी, भक्तीमय जीवनशैली आणि कुटुंब एकत्र ठेवण्याची त्यांची वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

देवगडसारख्या भव्य आणि श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे भास्करगिरी महाराज हे वारकरी संप्रदायातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभर ओळखले जातात. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील आधारवड हरपल्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण देवगड परिसर व वारकरी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणची विश्वस्त अथवा महाराज मंडळी अंत्यविधीला उपस्थित होते
त्यात ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष देवीदास महाराज म्हस्के, उद्धवजी महाराज मंडलिक,हभप सारंगधरजी महाराज,गोविंद महाराज जाटदेवळेकर, भागवताचार्य समाधान महाराज शर्मा,आळंदी येथील बाजीराव महाराज चंदेले नाना,कैलासगिरी महाराज,,विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे,केशव महाराज उखळीकर,आळंदी येथील डॉ.नारायण महाराज जाधव, महंत कैलासगिरी महाराज,वेरुळ येथील नाथ आश्रमाच्या साध्वी अक्का महाराज,साध्वी सुवर्णानंदगिरी चैतन्य, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथजी महाराज, रामकृष्ण आश्रमाचे महंत भगवान महाराज जंगले शास्त्री,महंत हरीशरणागरीजी महाराज, महंत नंदकिशोर खरात महाराज,हभप राम महाराज झिंजुरके,हभप बाळकृष्ण महाराज दिघे.विजयाताई अंबाडे, यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते

