spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedराष्ट्रीय कर्मचारी सेना-अमोल ससाणे अध्यक्षपदी बिनविरोध

राष्ट्रीय कर्मचारी सेना-अमोल ससाणे अध्यक्षपदी बिनविरोध

राष्ट्रीय कर्मचारी सेना’मध्ये कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश;


नेवासा, ता. — राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेच्या नेवासा एसटी डेपो कार्यकारिणी (2026-27) अध्यक्षपदी अमोल रवींद्र ससाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होत तसेच आमदार किरणजी पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ससाणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्क व हितासाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण’ या तत्त्वाचा आदर्श ठेवत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार विठ्ठलराव लंघे आणि संघटनाध्यक्ष किरणजी पावसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कर्मचाऱ्यांनी संघटनेत प्रवेश केला.


दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय पदाधिकारी तथा क्षेत्रीय उपाध्यक्ष चंद्रशेखर रा. ढवळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. राज्य महासचिव व्यंकटराव बिराजदार, कार्याध्यक्ष पंकज वालावलकर आणि राज्य उपाध्यक्ष कार्तिक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत ढवळे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.


नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष अमोल ससाणे, उपाध्यक्ष काशिनाथ जाधव व संजय बर्डे, सचिव विजय लक्ष्मण सोनवणे, सहसचिव बाबा खेडकर, कार्याध्यक्ष अनिल ननवरे, कोषाध्यक्ष गणेश वखरे, संगठक अंबादास नागरे, संघटन सचिव महादेव वारे आणि प्रचार प्रमुख शिवाजी वैरागर यांचा समावेश आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
35.8 ° C
35.8 °
35.8 °
15 %
3.4kmh
6 %
Thu
36 °
Fri
42 °
Sat
43 °
Sun
43 °
Mon
41 °

Most Popular

error: Content is protected !!