spot_img
spot_img
HomeUncategorizedअक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आ. विठ्ठलराव लंघे यांचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु

अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आ. विठ्ठलराव लंघे यांचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु

नेवासे( प्रतिनिधी) अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पारंपारिक पूजा विधी करून नेवासा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि विविध प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेवासा येथे पावन गणपती जवळ आ. विठ्ठलराव लंघे यांचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे,

नेवासा तालुक्यातील जाणसामान्य लोकांचे आमदार म्हणून विठ्ठलराव लंघे निवडून आले. अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आ. लंघे हे तळागाळातील माणसात लोकप्रिय असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय नव्हते. काल अक्षयतृतीया या शुभ मुहूर्तावर नेवासा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेवासा येथे पावन गणपतीजवळ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु केले.

याप्रसंगी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आ. विठ्ठलराव लंघे यांचे पुतणे संजय पांडुरंग लंघे व त्यांच्या पत्नीअश्विनी लंघे यांनी विधिवत पुजा केली. याप्रसंगी आ. विठ्ठलराव लंघे, डॉ. तेजश्री लंघे, कार्यालयातील प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. नेवासा मध्यवर्ती कार्यालयीन प्रमुख सुनील मोरे मोबाईल-९८६०७७८६८९ यांच्या संपर्क क्रमांकावर जनतेने आपली कामे सांगण्यासाठी संपर्क करावा असे आ. विठ्ठलराव लंघे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!