spot_img
spot_img
HomeUncategorizedअयोध्येत ५१हजार वारकरी हिंदी ज्ञानेश्वरीचे पारायण करणार

अयोध्येत ५१हजार वारकरी हिंदी ज्ञानेश्वरीचे पारायण करणार

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी अयोध्येत ५१हजार वारकरी हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नियोजन

देवगड येथे नियोजन बैठकीत विविध निर्णय

नेवासा (प्रतिनिधी) – श्री. संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे १९ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हिंदी भाषेतील सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण महोत्सवाचे आयोजन बालयोगी श्री. सदानंद महाराज पारायण महोत्सव समिती आणि अखिल वारकरी भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.

या महाआयोजनासाठी देवगड येथील श्री. दत्त देवस्थान येथे ९ जून रोजी नियोजन बैठक पार पडली. यावेळी पूजनीय भास्करगिरी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प. माधवदास राठी महाराज, देवगडचे स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज क्षेत्र संघटन मंत्री गोविंद शेंडे, क्षेत्रीय धार्मिक पुंज प्रमुख संजय मुरदाळे, सहप्रमुख नागनाथ बोंगरगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच नेवासा येथे विहिंपच्या पदाधिकाऱ्यांची व हितचिंतकांची स्वतंत्र बैठक झाली. यामध्ये संघटनवाढ, बालसंस्कार, नैतिक शिक्षण, गोसंवर्धन, सेंद्रिय शेती आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. गो-आधारित शेती व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यासाठी प्रशिक्षण व जनजागृती करण्याचे आवाहन केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रभाकरराव शिंदे यांनी केले.

या बैठकी नंतरश्री. दत्त देवस्थान व पैस खांब (ज्ञानेश्वरी लिखाण स्थळ) चे सर्वांनी दर्शन घेतले. यावेळी पर्यावरणपूरक पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीचे नियोजन व माहितीही देण्यात आली.

या बैठकीला वारकरी संप्रदायाचे चंद्रकांत कदम, नाना डौले, विहिंप मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा पालक विश्वनाथ नाणेकर, विशाल वाकचौरे,तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काळे, डॉ. शिंदे, प्रशांत बहिरट, बजरंग दल जिल्हासंयोजक शुभम मुर्तडक, सोनभाऊ परदेशी गणेश मुरदारे, आदित्य वाघ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
41.3 ° C
41.3 °
41.3 °
17 %
5.6kmh
100 %
Wed
41 °
Thu
45 °
Fri
41 °
Sat
40 °
Sun
35 °

Most Popular

error: Content is protected !!