spot_img
spot_img
HomeUncategorizedकामिका एकादशीसाठी पंचगंगा समूहाचा साबुदाणा खिचडी प्रसादाच्या वाटपाचा उपक्रमाचे 11 व्या वर्षी...

कामिका एकादशीसाठी पंचगंगा समूहाचा साबुदाणा खिचडी प्रसादाच्या वाटपाचा उपक्रमाचे 11 व्या वर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद!

अनेक मान्यवरांनी प्रसाद वाटपात घेतला सक्रिय सहभाग!

नेवासा (प्रतिनिधी) –

कामिका एकादशीच्या निमित्ताने पंचगंगा सीड्स आणि पंचगंगा शुगरचे चेअरमन प्रभाकरराव शिंदे यांच्या पुढाकाराने सलग अकराव्या वर्षी खजूर आणि साबुदाणा खिचडी वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. यावर्षी देखील 100 क्विंटल पेक्षा जास्त साबुदाणा खिचडीतसेच  खजूराचाही हजारो वारकरी भाविकांनी लाभ घेतला

ज्ञानेश्वर मंदिर परिसरात गेली 11 वर्ष पंचगंगा उद्योग समूहाचे तर्फे खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते व भाविक वारकरी देखील मोठ्या भक्ती भावाने या प्रसादाचा लाभ घेतात

या उपक्रमाला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पाक शाळेला भेट देऊन आशीर्वाद दिले तर प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले ,अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मंडल प्रमुख प्रताप चिंधे, मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे, किशोर गारुळे साहेब, सतीश कर्डीले, शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब पवार आणि सुभाष पवार यांनी भेट देऊन प्रसाद वाटपात सक्रिय सहभाग घेतला.

उपक्रमाचे संयोजन प्रभाकर काका शिंदे यांच्यासोबत बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, विवेक शिंदे आणि प्रबोध शिंदे यांनी केले. सुमारे १६० कर्मचारी व स्वयंसेवकांनी दोन दिवस अखंड सेवा देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
81 %
4.6kmh
100 %
Fri
26 °
Sat
25 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
27 °

Most Popular

error: Content is protected !!