बेलेकर कृषी महाविद्यालयामध्ये फॉर्म भरण्याची सुविधा निशुल्क
नेवासा (प्रतिनिधी) –
कृषि पदवी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी बेल्हेकर कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथे प्रवेशपूर्व सल्ला व मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुरेश पा. बेल्हेकर यांच्या सूचनेनुसार हे केंद्र सुरू करण्यात आले असून, येथे प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून देण्याची निशुल्क सुविधा दिली जाणार आहे.
या उपक्रमाची माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमठ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळात न पडता या केंद्राचा लाभ घ्यावा. प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी