spot_img
spot_img
HomeUncategorizedकै.सौ स्मिता देशपांडे स्मृती मंच च्या वतीने साहित्यातील सहा प्रकारांच्या पुरस्कारांचे आज...

कै.सौ स्मिता देशपांडे स्मृती मंच च्या वतीने साहित्यातील सहा प्रकारांच्या पुरस्कारांचे आज नाशिक येथे वितरण

अविनाश बल्लाळ यांच्या “माझी आध्यात्मिक अनुभूती”या पुस्तकाचे होणार प्रकाशन

कवयित्री कै.सौ स्मिता देशपांडे स्मृती मंच च्या वतीने साहित्यातील सहा प्रकारांच्या पुरस्कारांचे दि.३ मे रोजी नाशिकमध्ये आमदार सौ.सीमाताई हिरे यांच्या हस्ते वितरण होत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजकबल्लाळ बोबडे क्लासेस चे प्रा.अविनाश बल्लाळ यांनी सांगितले.

     इंदिरानगर नाशिक येथे सायंकाळी ५ ते  ७ यावेळेत  होत असलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते प्राध्यापक अविनाश बल्लाळ यांच्या “माझी आध्यात्मिक अनुभूती”या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
     
नेवासा येथील रहिवासी असलेल्या कवयित्री कै.सौ. स्मिताताई देशपांडे हया शीघ्र कवी,गायिका,बालवाडी शिक्षिका,उत्कृष्ठ निवेदिका,व्याख्यात्या होत्या त्यांनी अनेक महिलांना समाजात निर्भीडपणे जगण्यासाठी आपल्या कवितांच्या तसेच आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठे कार्य केले आहे.त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून त्यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ साहित्यातील सहा प्रकारातील यशस्वी व्यक्तींना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
  
    पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने  सौ सुकन्या जोशी प्रस्तुत.गायक विवेक केळकर व गायिका सौ मृणाली मालपाठक यांच्या “हे तर माझे गाणे”या सुरेल मैफिलीचे ही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले असून यानिमित्ताने नागरिक रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम कै सौ.स्मिता देशपांडे स्मृती मंचचे प्रमुख संयोजक बल्लाळ बोबडे क्लासेस चे प्रा.अविनाश बल्लाळ, दिलीपराव बल्लाळ विवेकराव बोबडे आणि गुरुप्रसाद देशपांडे यांनी केले

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!