आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शनी देवाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व अभिषेक करून घेतले दर्शन
नेवासे
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा भंडाफोड झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे स्पष्ट केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर, नेवासा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेतृत्व करणारे आ. विठ्ठलराव लंघे पाटील शनिशिंगणापूर येथे दाखल झाले. त्यांनी शनी देवाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि “भाविकांची वीस वर्षांची साडेसाती संपली” अशी टोकदार प्रतिक्रिया दिली.
आ. लंघे यांनी गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत शनि देवस्थानातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांनी मंदिरातील दानपेट्यांतील रोकड, पूजा साहित्य खरेदी, अनावश्यक कामगार भरती यांसह अनेक गैरप्रकारांच्या चौकशीसाठी लक्षवेधी सूचना दिली होती.या घोटाळ्याला विश्वस्त मंडळच पूर्णपणे जबाबदार असून, कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात केल्याचे मत आ. लंघे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणातील चौकशीस हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांचेदेखील निलंबन लवकरच होण्याची शक्यता आहे, असे आ. लंघे यांनी नमूद केले
यावेळी सचिन देसरडा, ज्ञानेश्वर माऊली पेचे, ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, प्रताप चिंधे, मनोज पारखे, प्रदीप ढोकणे, दत्तू पोटे, ललित मोटे, किरण जाधव, डॉ. कोलते, सयाराम बानकर, अशोक कर्डक, प्रमोद घावटे, आदिनाथ पटारे, राजेंद्र दराडे, विजय आव्हाड, रामकृष्ण आगळे, प्रमोद कुमावत, गणेश चौगुले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
चौकट
“रामराज्याची संकल्पना पुन्हा रुजवू”
, आ. विठ्ठलराव लंघे यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला लढा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी होईल. राज्यात पुन्हा एकदा ‘रामराज्य’ रुजवायचे आहे.” अशी भावना व्यक्त केली.