spot_img
spot_img
HomeUncategorizedखाकी ही फक्त कायद्याची नाही, तर माणुसकीची वर्दी आहे याचं जिवंत उदाहरण!"

खाकी ही फक्त कायद्याची नाही, तर माणुसकीची वर्दी आहे याचं जिवंत उदाहरण!”

” गरीब विधवेला दिला आधार – खाकी वर्दीतील माणुसकीचं जिवंत उदाहरण


नेवासे

नेवासे तालुक्यातील मक्तापूर येथील एका गरीब कुटुंबातील विधवा महिलेने आपल्या कष्टाच्या पैशांतून जवळपास ९० हजार रुपये एका पतसंस्थेत ठेवले होते. सफाई कामगार म्हणून रोजचा घाम गाळून, रात्रंदिवस श्रम करून तिने एक एक रुपया जमवला होता. परंतु दुर्दैव असे की, त्या पतसंस्थेने तिचे पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली.

तीन वर्षे तिच्या आयुष्या अशाच फेऱ्यांत गेली. पतसंस्थेच्या दरवाजात वारंवार निराशा पदरात पडली. शेवटी आशेचा किरण म्हणून तिनं नेवासा पोलीस स्टेशन गाठलं.

त्या वृद्ध अशक्त महिलेने खाडे साहेबांसमोर जेव्हा आपल्या दुःखाची कहाणी सांगितली, तेव्हा तिच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. एक आई, एक कष्टकरी स्त्री म्हणून तिच्या भावना ओसंडून वाहत होत्या. तिला पाहून खाडे साहेबही थबकले… त्या अश्रूंमागचं दुःख त्यांनी ओळखलं.

मग काय, खाकी वर्दीतील माणुसकी जागी झाली! खाडे साहेबांनी संबंधित पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं आणि पोलिसी शब्दांत जाब विचारला. फक्त दोन तासांत त्या महिलेचे संपूर्ण ९० हजार रुपये तिला परत मिळाले.

***खाडे साहेब नसते तर मला पैसे कधीच मिळाले नसते असे भावनिक उदगार त्या महिलेने काढले व साहेबांचे धन्यवाद मानले***



Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
few clouds
40.5 ° C
40.5 °
40.5 °
22 %
4.9kmh
16 %
Mon
39 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!