spot_img
spot_img
HomeUncategorizedगुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करावा-नंदकुमार पाटील

गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करावा-नंदकुमार पाटील

अमरनाथ ग्रुप व घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील अमरनाथ ग्रुप व लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर जीवनात यशाचे उच्च शिखर गाठावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
   अमरनाथ ग्रुप नेवासा व लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळयाचे आयोजन पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते.झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन नंदकुमार पाटील हे होते तर शिक्षण विभागाचे माजी अधिकारी त्रिंबकराव गायकवाड,रविंद्र जोशी,युवा उद्योजक राजेंद्र उंदरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
         यावेळी गुणवंत विद्यार्थी विराज गोरक्षनाथ काकडे, विद्या विजय ओहोळ,शर्वरी योगेश रासने,आर्यन चंद्रगुप्त पाटील,प्रज्ञा लक्ष्मण जाधव यांचा शाल बुके,स्कूलबॅग भेट देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.त्रिंबकराव गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव उपक्रम आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
       यावेळी बोलतांना नंदकुमार पाटील म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा उपक्रम त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस उभारी देणारा ठरणार आहे,गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर माऊलींच्या या भूमीचे नाव उज्वल करावे,जिद्द व चिकाटी अंगिकारून जीवनात उंच भरारी घ्यावी असे आवाहन यावेळी बोलतांना केले.यावेळी नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बजरंग ईरले,मेजर अरुण धनक,विकास शेंडे,शशिकांत नळकांडे,दिलीप जगदाळे,राजेंद्र महाजन,रामनाथ जाधव,सुरेश शिंदे, अंबादास ईरले, योगेश रासने,शंकर ओहोळ,गणेश चौव्हाण,जालिंदर गवळी, नवनाथ घोंगडे,शंभूराज जंगले पाटील,अशोक वैद्य,प्रविण कोरेकर उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
75 %
5.4kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!