नेवासा (प्रतिनिधी) – संतपरंपरेचा सन्मान जपत, श्री क्षेत्र नेवासा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य व्यासपूजा व गुरुपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 10 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्रके यांचे भावस्पर्शी कीर्तन होणार असून, भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमात अन्नदानाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याचे पुण्यकार्य श्री. जनार्दन पाटील हाडवे (माळवाडी) यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, श्री क्षेत्र नेवासा यांच्या वतीने करण्यात आले असून, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यात भक्तांनी एकत्र यावे, असा भावनिक संदेशही देण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा येथे असून, सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.