spot_img
spot_img
HomeUncategorizedगोमळवाडी येथील नवनाथ पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह पंचक्रोशीतून भाविकांच्या गर्दीने मोठा...

गोमळवाडी येथील नवनाथ पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह पंचक्रोशीतून भाविकांच्या गर्दीने मोठा प्रतिसाद !

गोमळवाडी नवनाथ पारायण सोहळ्याचे आठवे वर्ष ग्रामस्थांच्या प्रयत्नाने गोमळवाडीत भक्तीमय वातावरण

तालुक्यातील गोमळवाडी येथे जोगेश्वरी जगदंबा देवीचे मंदिरामध्ये 30 मे पासून सुरू झालेल्या नवनाथ गाथा पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह मध्ये दररोज पहाटेची काकड आरती, त्यानंतर सकाळी नवनाथ ग्रंथ पारायण, त्यानंतर दुपारी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे 

या सोहळ्याला देवगडचे प्रकाशानंद गिरी महाराजांनी आवर्जून भेट घेऊन मार्गदर्शन केले ,या कार्यक्रमांमध्ये गणेश महाराज गायकवाड ,संतोष महाराज खेडेकर ,अंकुश महाराज जगताप परमंस मुक्तानंद गिरी महाराज, डॉक्टर शुभम कांडेकर महाराज, दत्ता महाराज आयनर, संतोष महाराज सुकाळकर, योगीराज महाराज पवार ,भगवान महाराज जंगले शास्त्री ,यांची कीर्तने होत असून या कीर्तनाला पंचक्रोशीतून मोठा भाविक वर्ग उपस्थित असतो. सदरच्या सोहळ्यामध्ये दररोज दुपारी आणि रात्री परसरातील अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे वाटप होत असते

आठ जून रोजी या पारायण सोहळ्याच्या काल्याचे किर्तन निलेश महाराज रोडे यांचे होणार आहे तरी या सोहळ्याला व काल्याचे किर्तनाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवगडचे सेवेकरी बबनराव आरसुळे यांनी केले आहे

 सदरच्या नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह चे आयोजन गोमळवाडी ग्रामस्थांनी व भाविकांनी केले असल्याने संपूर्ण गावांमध्ये भक्तीमय वातावरण आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या हिरीरीने भाग घेताना दिसतात

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
24.3 ° C
24.3 °
24.3 °
93 %
4.2kmh
100 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
31 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!