पाच दिवसात अनेक अपघातांना आमंत्रण देणारा खड्डा
घोडेगाव (वार्ताहर) * दिलीप शिंदे याज कडून*
अहिल्या नगर संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथे नवकार मशिनरी समोर ट्रकला खड्ड्यांमुळे अपघात झाला.
संभाजी नगर कडुन अहिल्या नगर कडे माल भरलेला ट्रक बुधवारी पहाटे चार वा निघाला होता. नवकार मशिनरी समोर महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. तिथे सोनई पोलिस स्टेशन चे ए पी आय विजय माळी यांनी अपघात होऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावले होते.
तरी ही ट्रक चालक बॅरिकेड्स तोडुन रस्ता दुभाजकावर चढला. ट्रकचे पुढील दोन चाके,पाटे तुटले. सुदैवानेकुठलीही जिवीत हानी झाली नाही हा अपघात बुधवारी पहाटे चार वाजता झाला.
सां बांधकाम विभागाने खड्डा बुजवला होता. सततच्या पावसामुळे तो पुन्हा उखडला गेला. आणखी अपघात झाला. चार पाच दिवसात येथे अनेक अपघात झाले आहेत त्यात मोटरसायकलवरील तीन व्यक्तींना तर रुग्ण वाहिकेतुन नगरला पाठवावे लागले. खड्ड्यात आदळून एक कारची काच फुटली,एकीचे डिस्क तुटले ,रिक्षा पलटी होऊन महिला मुलं जखमी झाली. आणखी किती अपघाताची मालीका सु राहिलं हे सांगणे कठीण आहे. कारण सा बांधकाम विभागाचे प्रथम रस्त्यावर साचणा-या पाण्याचा निचरा करण्याची गरज आहे.
पाण्याचानिचरा करणेसाठी महामार्गावर दोन्ही बाजुला आर सी सी नाल्या बांधल्या आहेत पण ठिकाणी त्या बंद आहेत . ब-याच ठिकाणी नागरिकांनी नाल्याच्या पुढे रस्त्यावर चिखल होऊ नये म्हणुन मुरूम टाकून भराव केला. त्याच भराव मुळे नाल्या मधे पाणी जात नाही परिणामी रस्त्यावर खड्डे पडतात,अपघात होतात.
सां बा विभागाची जशी जबाबदारी आहे तशी ती ग्रामपंचायत व सामान्य नागरिकांची देखील आहे. रस्त्यावर भराव टाकु नका, नाल्या बुजवु नका ,वाहत्या ठेवा, नैसर्गिक उताराने नाल्याचे पाणी काढण्यास आडकाठी करु नका. —सां बा विभागाचेअभियंते भांगे ,अकोलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.