चिलेखनवाडी येथे रोड मॉडेल व्हिलेज संबंधात पहिली विशेष ग्रामसभा
नेवासा
प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२२५०३३४२
गाव नकाशा प्रमाणे असलेले शेतीचे रस्ते , गावशिवरस्ते अतिक्रमणमुक्त करणे व मोफत मोजणी करून खुले करणे तसेच शासनाच्या मदतीने रस्ते पक्के बनविणे व चिलेखनवाडी गाव नेवासा तालुक्यातील पहिले रोड मॉडेल व्हिलेज बनविण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी दिली
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे रोड मॉडेल व्हिलेज संबंधात पहिली विशेष ग्रामसभा दिनांक १७ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली रोड मॉडेल व्हिलेज ही संकल्पना महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरदराव पवळे यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे त्या संबंधातील माहिती महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी विषद करून या अंतर्गत गावच्या चारही शिवरस्त्यांचे मोफत मोजणी व अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार नेवासा व तहसीलदार मार्फत भूमी अभिलेख नेवासा यांचेकडून करून घेण्यासाठी पत्र व्यवहार करावा . त्यासाठी ही चळवळ संपूर्ण पाठपुरावा करणार आहे .असे स्पष्ट केले
शेतीसाठी रस्ता हा शेतकऱ्यांचा श्वास आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे
अध्यक्षस्थानी पोलिस पाटील मंगलताई सावंत या होत्या .
प्रास्ताविक सरपंच श्री भाऊसाहेब सावंत यांनी केले अतिक्रमित रस्त्यासंबंधी असलेली प्रकरणे निपटारा करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून आपणही सक्रिय होणार आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले ग्रामअधिकारी बाळासाहेब काळे यांनी अंजेडाचे वाचन केले .या सभेचे वेळी माजी सभापती अशोक मंडलिक ‘ माजी शिक्षणाधिकारी बी .डी .पुरी , तलाठी प्रियंका चव्हाण , उपसरपंच नाथा गुंजाळ , देविदास सावंत , निवृत्त मंडल अधिकारी रमेश सावंत , नेवासा तालुका शेत पाणंद रस्ते व शिवरस्ते चळवळीचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात (माका ) बाबासाहेब शिरसाठ ( भेंडा ), राजेंद्र गरड (कुकाणा ) , सोमाभाऊ माकोणे (अंमळनेर ) रामभाऊ पवार (अंमळनेर ) तसेच ग्रामस्थ विठ्ठल पवार , शेषराव भातंबरे , काशिनाथ गोसावी , पाणीवापर सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय भातंबरे , सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब सावंत ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड , सुमंत कांबळे , चंद्रकांत पाडळे , आण्णा सुराशे , असाराम भोसले ,मुख्याध्यापक सुरेश सानप ,डॉ अनिल गायकवाड , भगवान अडवणे , अन्सार शेख , सुरेश कांबळे , सुनील गायकवाड , महसूल अधिकारी श्रीमती प्रियंका चव्हाण, किरण गर्जे , मच्छिंद्र सावंत , पांडुरंग मुरकुटे , रवि कांबळे , सिद्धार्थ खंडागळे , एकलव्य टायगर फोर्सचे उपाध्यक्ष राम पवार , मधुकर काटे , शिमोण कांबळे , सुभाष वासेकर , अमोल वासेकर , गोरक्षनाथ गुंजाळ संजय गुंजाळ , रावसाहेब सावंत , जालिंदर गायकवाड ‘ , माजी सरंपच सुशिल कांबळे , बाळासाहेब दळवी , दिपक नटवणे , साहेबराव गव्हाणे कैलास गायकवाड छबू आहेर गावातील बहुसंख्य शेतकरी व शेत रस्ता पीडित शेतकरी उपस्थित होते.