निंभारी { किरण जाधव याज कडून}
टाकळीभान येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी सामाजिक कार्यकर्ते तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती. पार पडली
टाकळीभान (ता. नेवासा येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्ती पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते तुषार पवार उपस्थित होते
. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली त्यानंतर तुषार पवार यांनी आपल्या संभाषणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचां गौरव करत मित्र परिवाराला त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक युवा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते उपस्थित सर्व मित्र परिवाराकडून महाराजांच्या जय घोषणात सहभाग नोंदवला