नेवासा दर्शन | नाथा शिंदे याज कडून
नेवासा
सध्या राज्यातील शेतकऱ्यांपुढील प्रमुख समस्या म्हणजे शेत व शिव रस्त्यांची दुरवस्था. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील श्री शरद भाऊसाहेब पवळे यांच्या पुढाकाराने “महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळ” सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत “रोड मॉडेल व्हिलेज” ही अभिनव संकल्पना राबविण्यासाठी आता जिल्हास्तरावर कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
या संदर्भात नुकताच नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याला अध्यक्षस्थान लाभले होते राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांचे. यावेळी शेत व शिव रस्त्यांच्या समस्येवर सखोल चर्चा होऊन, कार्यपद्धती ठरविण्यात आली.
जिल्हाभरातील सर्व तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन संघटनांचा जनन्यायाधीन आयोजित करणे, तालुका भूमि अभिलेख कडून शेत व शिव रस्ते मोजणी कामी प्रयत्न करणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्ता करिता विशेष ग्रामसभा घेऊन रोड मॉडेल व्हिलेज ही संकल्पना तहसीलदार भुमिअभिलेख व पंचायत समिती यांना पत्र व्यवहार करून प्रत्यक्षात गावाच्या चारही बाजूचे शिवरस्ते शासनाकडून मोफत मोजणी घेऊन शिव हद्दी निश्चित करणे, गावातील नकाशावरील सिंगल डॉट इन डबल डॉटेड रस्ते भूमी अभिलेख कडून नकाशा घेऊन वेळ पडल्यास मोजणी करून तहसील कार्यालया मार्फत पोलीस बंदोबस्तात खुली करणे,
व इतर ग्रामविकासाचे कामे संदर्भात ही कोर कमिटी जिल्हाभर काम करणार आहे असे असे ठरविले
या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब तुकाराम थोरात (माका), भाऊसाहेब तेलोरे (राहुरी), गुलाब लांडगे (नगर), अर्जुन ससेवाडी, महेश पटारे (वांबोरी), संतोष थोरात (बाभूळगाव), सोमनाथ माकणे (अमळनेर), रामदास पवार (अमळनेर), कानिफनाथ कदम (खुणेगाव), कारभारी एकनाथ गरड (भेंडा), अमोल पोटे (नगर), पोपट शेळके (मिरी), विकास जाधव (पाथर्डी), सुभाष शेळके (वाडेगव्हाण), राजेंद्र विठ्ठल गरड (कुकाणा), प्रशांत चौधरी (रांजणगाव), विजय हापसे (ब्राह्मणी) व सगाजी ऐनर (धनगरवाडी) आदींचा सहभाग होता.
सर्वांनी एकत्र येऊन कार्यरत राहिल्यास, शेत व शिव रस्त्यांच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकतो, असा विश्वास श्री. शरद पवळे व नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी व्यक्त केला.