
नेवासे येथील संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानमध्ये शनिवारपासून पंधरा दिवसीय उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
. विद्यार्थ्यांत संस्कार आणि संस्कृती तसेच आध्यात्मिक ज्ञानाची भर पडावी, याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी दिली.
शिबिरात काकडा भजन,संस्कृत श्लोक विष्णुसहस्रनाम, योग, प्राणायाम,ज्ञानेश्वरी पाठांतर, संतांचे चरित्र, तसेच प्रवचन कसे करायचे, याविषयी ज्ञान दिले जाणार आहे. हार्मोनियम व मृदंग शिकविले जाणार आहे.
शिबिरात भगवान महाराज जंगले, गहिनीनाथ महाराज आढाव, नंदकिशोर महाराज खरात, राम महाराज खरवंडीकर, कृष्णा महाराज हारदे यांच्यासह सतरा कीर्तनकार मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे (९८८१८५०११७) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे