spot_img
spot_img
HomeUncategorizedज्याच्या बोलण्यात, वागण्यात व कृतीत सत्यता आहे तो माणूस धार्मिक… उद्धव महाराज...

ज्याच्या बोलण्यात, वागण्यात व कृतीत सत्यता आहे तो माणूस धार्मिक… उद्धव महाराज मंडलिक

सद्गुरू आश्रमात संत पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

 

 नेवासा :

ज्याच्या घरात लक्ष्मी आणि नारायणाची कृपा आहे त्यांची लक्ष्मी सतपात्री दानात जाते अन्नदान सारखे महत्त्वाचे दान नाही असे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांनी केले 

 सुरेगाव रोड नेवासा बुद्रुक शिवारातील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात लोणी येथील नामदेवराव  शिंदे तसेच सद्गुरू आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला संतपूजन सोहळा व आंबेरस भंडारा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते

गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होतो असं नाही तर ज्याच्या बोलण्यात, वागण्यात व कृतीत सत्यता आहे तो माणूस धार्मिक…..”

      या वेळी सद्गुरू आश्रमाचे प्रमुख  ह.भ.प.महंत उद्धव महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी उपस्थित संत, महंत, महाराज मंडळी व स्नेहीजणांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.शिंदे परिवाराच्या वतीने उपस्थित संत, महंत, महाराज मंडळींचे पूजन करण्यात आले. आश्रमाचे शिक्षक  बाळासाहेब झिने सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

     यावेळी ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के(संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा), ह.भ.प.भगवान महाराज जंगले,शास्त्री (रामकृष्ण आश्रम, गोणेगांव), महंत विजय महाराज खेडकर (सप्तशृंगी माता देवस्थान, लिंबेजळगाव), महंत रमेशानंदगिरी महाराज (त्रिवेणीश्वर देवस्थान, हंडीनिमगाव), महंत दत्तगिरी महाराज (मध्यप्रदेश) यांनी मनोगत व्यक्त केले. 

        यावेळी मृदूंगमहर्षी ह.भ.प.युवराज महाराज देशमुख(श्री क्षेत्र आळंदी), ह.भ.प.विश्वनाथ दादा मंडलिक,ह.भ.प.संजय महाराज जगताप (वैजापूर), ह.भ.प.संजय महाराज सरोदे, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार, ह.भ.प. विजय महाराज पवार, ह.भ.प.भारत महाराज धावणे, ह.भ.प.बाबा महाराज मोरे, ह.भ.प.अंकुश महाराज जगताप(संत तुकाराम महाराज संस्थान, नेवासा), ह.भ.प.नामदेव महाराज जाधव (शास्त्री), ह.भ.प.भगवान महाराज डिके, ह.भ.प.शिवप्रसाद महाराज पंडित, ह.भ.प.महेंद्र महाराज शेजूळ, ह.भ.प.लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज हाजारे, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज आढाव, ह.भ.प.मंगेश महाराज वाघ, ह.भ.प.गणेश महाराज तनपुरे, ह.भ.प.आकाश महाराज शेटे,गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे,बाबासाहेब महाराज सातपुते, अशोक महाराज निरफळ, सोपान महाराज दारकुंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
few clouds
32.3 ° C
32.3 °
32.3 °
46 %
7.5kmh
11 %
Wed
32 °
Thu
44 °
Fri
40 °
Sat
40 °
Sun
34 °

Most Popular

error: Content is protected !!