नेवासे
डॉ. मुकुंदराव गायकवाड यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश झाला शेतकरी संरक्षण कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे
शेतकरी संघटनेची अहिल्या नगरच्या सावेडी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून संघटनेला बळ मिळाले आहे
डॉ. गायकवाड यांचा संघटनेत प्रवेश झाला त्यांचा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि हायकोर्टातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजितराव काळे यांच्या हस्ते संघटनेचा बिल्ला लावून सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी ‘शेतकरी संरक्षण कायदा’ तयार करण्यासाठी मी माझा सर्व वेळ आणि ज्ञान देणार आहे.”

या प्रसंगी कृषी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. डॉ. अशोकराव ढगे (कृषी शास्त्रज्ञ), अशोक सब्बन(भारतीय जनसंसदेचे राज्याध्यक्ष), अॅड. कारभारी गवळी, सरपंच सरक (डोंगरगण), प्रगतशील शेतकरी हुकूम बाबा नवले (बाभुळखेडा), शेती व्यावसायिक केशवराव लोखंडे, कार्यकर्ते वीर बहादुर सिंग प्रजापती, भारतीय जनसंस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे आणि युवक कार्यकर्ते कैलास पठारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या बैठकीतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.