spot_img
spot_img
HomeUncategorizedदिनकर यांच्या निवडी मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह -ऋषिकेश शेटे

दिनकर यांच्या निवडी मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह -ऋषिकेश शेटे

घोडेगाव येथे भव्य नागरी सत्कार

नेवासे

नेवासा तालुक्याच्या भूमिपुत्राला न्याय मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य आल्याचे प्रतिपादन ऋषिकेश शेटे यांनी केले आहे

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीकडून नुकतीच नितीन दिनकर यांची भाजप उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर घोडेगाव येथे नितीन दिनकर यांचा शिवसेनेचे माथाडी कामगार तालुकाध्यक्ष नितीन शिरसाठ आणि भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. डीजेच्या आकर्षक रोषणाईत आणि साऊंड सिस्टिमसह कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमात बोलताना ऋषिकेश शेटे म्हणाले, “नेवासा तालुक्याच्या भूमिपुत्राला जिल्हाध्यक्षपद मिळाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. नितीन दिनकर हे पक्षाशी निष्ठावान राहून, विविध संघटनात्मक पदांवर यशस्वी काम करत आले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “शिर्डी लोकसभा व विधानसभा जागा मित्रपक्षाला गेल्याने उमेदवारी न मिळाल्याचे प्रसंग आले, तरीही पक्षावर नाराजी न दाखवता त्यांनी संघटन बळकट केले. त्यांची ही निवड कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

शिवसेना नेते नितीन शिरसाठ यांनीही मनोगतातून नितीन दिनकर यांची कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता आणि २४ तास कार्यक्षमतेने उपलब्ध राहणाऱ्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
75 %
5.4kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!