spot_img
spot_img
HomeUncategorizedदेवगडच्या प्रवरा नदीवरील पादचारी पुलासाठी ठोस निधीची मागणी — आमदार विठ्ठलराव लंघे...

देवगडच्या प्रवरा नदीवरील पादचारी पुलासाठी ठोस निधीची मागणी — आमदार विठ्ठलराव लंघे यांची पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही निवेदन

देवगड दत्त मंदिर प्रवरा नदीवरील गेली दहा वर्षे रखडलेला पादचारी पूलाचे काम मार्गी लागणार

अहिल्यानगर (नेवासा प्रतिनिधी) | दि. ६ जून २०२५

श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर संस्थानजवळील प्रवरा नदीवरील गेली दहा वर्षे रखडलेला पादचारी पूल अखेर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आज नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर येथे आयोजित शिवसेनेच्या भव्य पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्यासमोर या अपूर्ण पुलाच्या कामासंदर्भात ठोस पाठपुरावा केला.

या पादचारी पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीअभावी काम रखडल्याची अधिकृत नोंद असून, देवगड परिसरातील १३ गावांमधील नागरिक, विद्यार्थी आणि दत्त भक्त मंडळींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवरा नदी ओलांडताना पायी चालणाऱ्या दिंड्या आणि शालेय विद्यार्थी यांना होडीद्वारे जीवघेणा प्रवास करावा लागतो, ही बाब आमदार लंघे यांनी मंत्री देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली.

या पूलाच्या पूर्णत्वामुळे केवळ भक्तांची गैरसोय दूर होणार नाही, तर धामोरी मार्गे कालभैरवनाथ मंदिर, नाथबाबा मंदिर व श्रीरामपूर रोडमार्गे येणाऱ्या दिंड्या व भाविकांना थेट लाभ होऊन जवळपास ५ किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. परिसरातील बहिरवाडी, बेलपिंपळगाव, साईनाथ नगर, टाकळीभान, बेल पांढरी, जैनपूर, भालगाव या गावांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेत “या पूलासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल व काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार लंघे यांनी यावेळी दिली.

तालुक्याच्या विकासासाठी व भक्तांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे पादचारी पुलाचे काम आता मार्गी लागण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे, अशी आशा परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
29.5 ° C
29.5 °
29.5 °
63 %
9.1kmh
48 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!