spot_img
spot_img
HomeUncategorizedनागेबाबा मल्टिस्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख...

नागेबाबा मल्टिस्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख रूपयेचा धनादेश प्रदान


वडळा बहिरोबा वार्ताहर * विठ्ठलराव उदावंत याज कडून*

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट वडाळा शाखेचे खातेदार सभासद कै.निखिल भाऊसाहेब पवार यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती. आज त्यांच्या वारसास 10,00,000/- अक्षरी दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.कै. निखिल पवार यांच्या मागे वडील/आई व एक बहिणी असे कुटुंब आहे. यावेळी
ह.भ.प.राम महाराज बोचरे( खरवंडीकर ) मुळा साखर कारखाना संचालक भाऊसाहेब पाटील मोटे, वडाळा ग्रामपंचायतचे सरपंच ललित पांडुरंग मोटे, उपसरपंच सचिन विलास मोटे, उपसरपंच मा.बाबासाहेब सुधाकर मोटे, राहुल मोटे , मेजर दत्तात्रय मोटे, प्रदीप मोटे, योगेश्वर भाकरे, निलेश मोटे, अनिल गायकवाड, माऊली गायकवाड, उमकांत भोगे व इतर ग्रामस्थ , नागेबाबा परिवारातील सदस्य संजूनाना मनवेलीकर , राजूभाऊ चिंधे,सुनिल दगडे, अवधूत लोहकरे उपस्थित होते तसेच नागेबाबा मल्टीस्टेट वडाळा शाखेचे पालक अधिकारी नितीन घोडके, सुरक्षा कवच अधिकारी योगिता पटारे, एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे, शाखाधिकारी जीवन आगळे, गणेश कोकाटे तुषार.जावळे सोमनाथ घुले सायली. गाडीलकर पंतगे गोल्डन व्हँल्युअर विठ्ठल उदावंत या कार्यक्रमला हजर होते

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!