spot_img
spot_img
HomeUncategorizedनागेबाबा मल्टिस्टेटतर्फे मयत सभासदाच्या वारसास १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त

नागेबाबा मल्टिस्टेटतर्फे मयत सभासदाच्या वारसास १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त


वडाळा बहिरोबा (वार्ताहर)***:विठ्ठल उदवंत याज कडून***


श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या वडाळा शाखेच्या खातेदार सभासद कै. निखिल भाऊसाहेब पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना “नागेबाबा सभासद सुरक्षा कवच” योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा धनादेश त्यांच्या वारसांना संस्थेच्या वतीने सुपूर्त करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी ही योजना सभासदांच्या हितासाठी कार्यरत असून, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांपर्यंत व अपघात झाल्यास ५ लाखांपर्यंतचा हॉस्पिटल खर्च संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. सभासद हा आपल्या परिवाराचा भाग मानत संस्थेने वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कार्यक्रमास ह.भ.प. राम महाराज बोचरे (खरवंडीकर), मुळा साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील मोटे, वडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच ललित पांडुरंग मोटे, उपसरपंच सचिन विलास मोटे व मा. बाबासाहेब सुधाकर मोटे, तसेच राहुल मोटे, मेजर दत्तात्रय मोटे, प्रदीप मोटे, योगेश्वर भाकरे, निलेश मोटे, अनिल गायकवाड, माऊली गायकवाड, उमकांत भोगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

नागेबाबा परिवारातील संजूनाना मनवेलीकर, राजूभाऊ चिंधे, सुनिल दगडे, अवधूत लोहकरे यांच्यासह वडाळा शाखेचे पालक अधिकारी नितीन घोडके, सुरक्षा कवच अधिकारी योगिता पटारे, एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे, शाखाधिकारी जीवन आगळे, तसेच गणेश कोकाटे, तुषार जावळे, सोमनाथ घुले, सायली गाडीलकर, पंतगे आणि गोल्डन व्हॅल्युअर विठ्ठल उदावंत यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.

कै. निखिल पवार यांच्या पश्चात वडील, आई व एक बहिण असा परिवार आहे. या योजनेमुळे त्यांना आर्थिक आधार मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!