spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा उपविभाग नेवासा उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणीने...

नेवासा उपविभाग नेवासा उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणीने नाशिक विभागात पहिल्या नंबर वर —


नेवासा (ता. 21 मे) — शासनाच्या 26 मे 2022 च्या निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या नेवासा उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालयाने अल्प कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नेवासा, शेवगाव व पाथर्डी या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या या नव्याने स्थापन झालेल्या उपविभागाने केवळ शंभर दिवसांत कार्यालयीन व्यवस्थापन, सेवा सुविधा आणि माहिती फलकांचे अद्ययावतीकरण करत नाशिक विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे

जलयुक्त शिवार2 0 योजनेचा सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या या विभागाचे प्रवीण दहातोंडे या अधिकाऱ्यांनी नेवासा (12 गावे), शेवगाव (17 गावे) आणि पाथर्डी (18 गावे) येथील पाण्याचे ताळेबंद तयार करून गाव आराखडे GEO Portal वर यशस्वीरित्या अपलोड केले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत प्रगती करताना तिन्ही तालुक्यांतील मागणी प्राप्त सर्व कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून सन 2024-25 मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने 10 कामे पूर्ण झाली आहेत.

जैनपूर, घोगरगाव व बेलपांढरी येथील कापरी ओढ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. परिणामी 300 एकर क्षारपड जमीन लागवडीयोग्य झाली. हे काम जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेच्या माध्यमातून पार पडले.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत विविध कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी पाथर्डी तालुक्यातील करंजी, दगडवाडी, घाटशिरस व सातवड या गावांमध्ये करण्यात आली.

उपविभागाच्या यशस्वी वाटचालीला प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, नाशिक श्री. हरिभाऊ गिते तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी, अहिल्यानगर श्री. पांडुरंग गायसमुद्रे यांनी उपविभागाच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन व्यक्त केले.


उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. प्रविण दहातोंडे यांनी या यशाचे श्रेय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सर्व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना दिले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, “हे यश एकट्याचे नसून संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे. भविष्यातही अशीच गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धती जपली जाईल.”

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
78 %
4.8kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!