नेवासा(प्रतिनिधी)नेवासा खुर्द जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येऊन चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड हे होते तर शिक्षण विस्तार अधिकारी संजय शेळके,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, शालेय व्यवस्था समितीच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता कडू,रामदास पालवे,जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदाताई गवळी,खुपटी शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी सांगळे,गौतम जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असिफ शेख यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.आजच्या कार्यक्रमात चौथीच्या ९७ विद्यार्थ्यांना आम्ही निरोप देत असल्याचे सांगत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन व डोक्यावर क्रॉऊन घालून करण्यात आले.इयत्ता चौथीचे विद्यार्थी इयत्ता पाचवीत प्रवेश घेणार असल्याने त्यांना निरोप देतांना पुढील यशस्वीपणे शिक्षण घेण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बचत केलेल्या खाऊच्या पैशातून शाळेला कपाट भेट दिला.या अनोख्या भेटीचे उपस्थित शिक्षकांसह पालकांनी कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उत्कर्षासाठी योगदान देण्याचे आश्वासन दिले तर शिक्षकांनी देखील जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या अध्यापनाद्वारे दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार बोलतांना केला.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक साईनाथ वडते यांनी केले तर उपाध्यापक अरविंद घोडके यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले.
यावेळी शिक्षिका प्रतिभा पालकर,मीनाक्षी लोळगे, प्रतिमा राठोड,शिक्षक अण्णासाहेब शिंदे,विद्या खामकर, अश्विनी मोरे,ज्योती गाडेकर,अर्चना बोकारे,प्रतिभा गाडेकर यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
