spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा पंचायत समितीचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांक – एक गौरवशाली कामगिरी

नेवासा पंचायत समितीचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांक – एक गौरवशाली कामगिरी

शंभर दिवसांत शंभर टक्के यश मिळाल्याने नेवासा पंचायत समितीचे नाशिक विभागात द्वितीय स्थान

नेवासा पंचायत समितीने ‘शंभर दिवसांच्या उपक्रमात’ उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून, ही कामगिरी नेवासा तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री. संजय लखवाल सर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. बाळासाहेब कासार, प्रशासनाधिकारी श्री. कंगे साहेब, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. मते साहेब, श्रीमती दिघे मॅडम व इतर सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

शंभर दिवसांच्या कालावधीत ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या सकारात्मक कामगिरीचे हे फळ आहे. द्वितीय क्रमांक मिळवणे हे नेवासा पंचायत समितीच्या एकत्रित प्रयत्नांचे, पारदर्शक प्रशासनाचे आणि जनतेच्या सहभागाचे फलित असून, हे यश संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरले आहे.

या यशानंतर आज पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आशिष येरेकर साहेब यांच्या हस्ते गटविकास अधिकारी श्री. संजय लखवाल सर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींसमक्ष नेवासा पंचायत समितीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत जिल्हा परिषदेला लाभलेला हा सन्मान अभिनंदनीय असल्याचे मत व्यक्त केले.

या वेळी मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजी लांगोरे साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेळके साहेब, गुंजाळ साहेब तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

गटविकास अधिकारी श्री. लखवाल सर यांनी सत्काराला उत्तर देताना नम्रतेने सांगितले की, “हे यश माझे एकट्याचे नसून, माझ्या सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि परिचर यांच्या सामूहिक कष्टाचे परिणाम आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.”

नेवासा पंचायत समितीच्या वतीने सांगण्यात आले की, “या कार्यकाळात अनवधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. पुढे अधिक जागरूक राहू.”

“सर्वांगीण विकासासाठी समर्पित सेवा” ही आमची बांधिलकी यापुढेही अविरतपणे सुरू राहील आणि आगामी काळात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
75 %
5.4kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!