spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा फाटा येथे कार सह पाच लाख रुपयाची अवैध देशी दारू पकडली

नेवासा फाटा येथे कार सह पाच लाख रुपयाची अवैध देशी दारू पकडली

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची धडाकेबाज कामगिरी

नेवासे (ता. २० मे) – नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपये किमतीचा दारू साठा आणि वाहन जप्त केला. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे आपल्या पथकासह नेवासा फाटा येथे वाहन तपासणी करत होते. यावेळी सफेद रंगाच्या सिआझ कार (क्र. MH ०१ CD ०४१६) मधून कुकाणाकडे जात असलेल्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या दारूच्या २०० बाटल्या आढळून आल्या. ही दारू दोन बॉक्समध्ये भरलेली असून प्रत्येक बाटलीची किंमत ३५ रुपये आहे.

कार आणि दारू असा एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ५,०७,००० रुपये इतकी आहे. सदर वाहनात असलेले दोघे आरोपी –
१) रोहीदास भगवान गुंजाळ (३३ वर्षे)
२) अभिषेक दुर्गाअण्णा गुंजाळ (२२ वर्षे),
दोघेही रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर – यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईदरम्यान मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलीस विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, नेवासा परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, ज्यांच्यावर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींविरुद्ध जास्तीत जास्त रकमेचे बाँड घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तसेच जर ही कारवाई पुरेशी नसेल, तर हद्दपारीसारखी कठोर पावले उचलली जातील, असे ठणकावून सांगण्यात आले आहे.चालू राहणार आहे ठणकावून सागितल.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्ष श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचन मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकार व पोलीस अंमलदार यांनी कलेली आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
75 %
5.4kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!