spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा फाटा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

नेवासा फाटा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

महापुरुष कोणत्याही पक्षाचे नसतात – माऊली देवकाते यांचे प्रतिपादन


नेवासा (प्रतिनिधी) गणेश झगडे याज कडून

– नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील अहिल्यादेवी चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे नेते माऊली भाऊ देवकाते यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

कार्यक्रमात बोलताना माऊली देवकाते म्हणाले, “राजमाता अहिल्यादेवी यांनी समाजासाठी झोकून देऊन कार्य केले. त्यांनी कोणत्याही जात, धर्म, पक्ष न पाहता लोकहितासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती सुद्धा राजकारण बाजूला ठेवून सर्व समाजाने एकत्र येऊन साजरी केली पाहिजे. महापुरुष कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व समाजाचे असतात,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या वेळी मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे, मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, उपसरपंच कानिफनाथ कराडे, संचालक भरत काळे, नेवासा येथील नामदेव कराडे, राजेंद्र महानोर, गणेश कराडे, श्रीकांत देवकाते, लक्ष्मण कराडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
36.5 ° C
36.5 °
36.5 °
39 %
6kmh
32 %
Mon
41 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!