नेवासा प्रतिनिधी –
मंगळवारी (२९ जुलै) रात्री दहा वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथे चंद्रकांत दरंदले यांच्या वृत्तपत्र विक्री व पान स्टॉल येथे गप्पा मारत उभे असलेल्या पत्रकार शंकरराव नाबदे यांना विनाकारण दमदाटी करत मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मराठा महासंघाचे जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश झगरे यांना देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी पत्रकार शंकरराव नांबदे आपल्या वडिलांना उपचारासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पत्रकार चंद्रकांत दरंदले यांच्या चहाटपरीवर ते चंदू भाऊ व गणेश झगरे यांच्यासह गप्पा मारत उभे होते. याचवेळी एका ग्राहकाने सिगारेट घेतली आणि जात असताना नेवासा फाटा येथील एका व्यक्तीने त्याला अडवून “मला दोन सिगारेट पाजव” अशी दमदाटी केली व त्याची दुचाकी खाली फेकून दादागिरी सुरू केली.
फिर्यादीने सदर व्यक्तीस समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर अचानक हल्ला करत मारहाण करण्यात आली. भांडण शांत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या गणेश झगरे यालाही पाठीवर, डोक्यावर, कानाच्या वरच्या भागावर आणि मांडी-पोटरीवर जबर मारहाण करण्यात आली.
घटनेनंतर जखमीं झगरे तात्काळ दवाखान्यात जाऊन प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर रात्री उशिरा नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मारहाण करणारा मुख्य आरोपी नेवासा फाटा येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
झालेल्या दुर्दैवी प्रकाराचा नेवास शहर प्रेस क्लब व नेवासा तालुक्यातील पत्रकार बांधवांकडून निषेध व्यक्त होत आहे
पत्रकारावरील हया भ्याड हल्ल्याचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात आला असून या गुंड प्रवृतीच्या लोकांचा बंदोबस्त करा,गुंड प्रवृतीच्या लोकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली.दिलेल्या निवेदनावर नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,अध्यक्ष मोहन गायकवाड,
अशोक डहाळे,सुधीर चव्हाण,कैलास शिंदे,नाना पवार, सुहास पठाडे,शाम मापारी, मकरंद देशपांडे,पवन गरुड, रमेश शिंदे,शंकर नाबदे यांच्या सहया आहेत
पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करत आहेत.