दारूच्या नशेत दगड मारणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घातली बेडी!
नेवासे
नेवासा फाट्यावर गुरुवारी सायंकाळी . विरान्स वाईन्स समोर दारूच्या नशेत बेशिस्त तिघांनी चक्क एकमेकांवर दगडफेक हल्ला चढवला. या तिघांना हाणामारी करत असताना पाहून कोणीतरी डायल 112 वर फोन करून पोलिसांना पाचारण केले आणि काही मिनिटांतच पोलिसांचा बंदोबस्त घटनास्थळी धडकला.
पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, किरण गायकवाड आणि गणेश जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी वेळीच हस्तक्षेप करत तिघांना बंदिस्त केले टाकले
तिघेही – प्रविण काशिनाथ शेळके, अंकुश अशोक डौले आणि अक्षय अशोक दळवी (सर्व रा. नेवासा बुद्रुक) – यांना ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीस पाठवले असता त्यांचा मद्यपान केल्याचा अहवाल आला.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यास सहा महिने कारावास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय माने करत आहेत.
“दारूच्या नशेत कायदा हातात घेणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. अशी कारवाई यापुढेही सुरूच राहील,” असा इशारा निरीक्षक जाधव यांनी दिला.