spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा व श्रीरामपूरसाठी गौरवाची बाब असलेले नितीन दिनकर भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदीअनुभव, संयम...

नेवासा व श्रीरामपूरसाठी गौरवाची बाब असलेले नितीन दिनकर भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदीअनुभव, संयम आणि कार्यक्षमता यांचे उत्तम प्रतीक — पक्ष संघटनेला नवे बळ येणार !

भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नेवासा (प्रतिनिधी):
भाजप उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची निवड होताच संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणारे, शिस्तप्रिय आणि सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे नेतृत्व म्हणून दिनकर यांची ओळख आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

नेवासा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत मंडल अध्यक्ष प्रताप चिंधे यांनी याप्रसंगी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “नितीन दिनकर हे नेतृत्व केवळ पदासाठी नसून, ते एक प्रेरणा आहेत. त्यांनी आतापर्यंत पक्षात ज्या निष्ठेने काम केले आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा ठरेल.”

चिंधे पुढे म्हणाले, “पुन्हा एकदा नेवासा तालुक्याला जिल्हाध्यक्षपद मिळाले असून, ही केवळ भूगोलाची बाब नसून तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. दिनकर यांच्यासारख्या संयमी व दूरदृष्टी असलेल्या नेत्यामुळे भाजप उत्तर नगर जिल्ह्यात यशाच्या नव्या वाटा पल्लवित करेल.”

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत दिनकर यांचे नाव ठराविक ठामपणे पुढे आले. त्यांचे नेवासे व श्रीरामपूर तालुक्यांवरील प्रेम आणि तिथे रुजवलेले कार्यकर्त्यांचे जाळे, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद मानली जात आहे.

या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यांमध्ये फटाके फोडून, मिठाई वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत भाजप नक्कीच नव्या उमेदीने उतरेल, याबाबत कार्यकर्ते आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
78 %
4.8kmh
100 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!