मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासात सामाजिक उपक्रमांचा जल्लोष
गरजू विद्यार्थ्यांना सायकल, शालेय साहित्य आणि कपड्यांचे वाटप
नेवासा प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेवासा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
सोनई येथील माजी खासदार स्व. तुकाराम पाटील गडाख यांच्या आदर्श विद्यामंदिर शाळेमधील गरजू विद्यार्थिनी वैष्णवी वैरागर, मयुरी भोगे आणि साधना शिंदे यांना नवीन सायकल देण्यात आली. तसेच खरवंडी येथील आदिवासी वस्तीवरील ३५ मुला-मुलींना नवीन कपडे, बूट, शालेय बॅग, कंपास पेटी, वही, पेन-पेन्सिल आणि खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आदर्श विद्यालयाचे प्राध्यापक तूवर सर, अनिल दरंदले सर, पवार सर, दराडे सर, सी.बी. दरंदले सर, गुलदगड सर, डॉ. संकेत दरंदले यांच्यासह अक्षय भुसारी, ओमकार शेटे पाटील, संग्राम पाटील, आकाश सोनवणे आणि मित्रपरिवार उपस्थित होता. ऋषिकेश शेटे पाटील यांच्या पुढाकारातून मोठ्या उत्साहात हा वाढदिवस सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला.