spot_img
spot_img
HomeUncategorizedबनावट ॲप घोटाळ्यातील कारवाईसाठी शिंगणापुरात धरणे आंदोलन

बनावट ॲप घोटाळ्यातील कारवाईसाठी शिंगणापुरात धरणे आंदोलन

नेवासे

“देवस्थान प्रशासनाने केवळ तीन ॲपवर कारवाईची मागणी करून इतर बनावट ॲप, देणगी पावत्या व QR कोड घोटाळ्यांबाबत मौन का बाळगले? हा प्रकार संशयास्पद असून संपूर्ण चौकशी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश नेते संभाजी माळवदे यांनी शिंगणापूर येथे झालेल्या धरणे आंदोलनात दिला

शनीशिंगणापूर येथे झालेल्या बनावट ॲप घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेस पक्ष व विविध संघटनांच्या वतीने शिंगणापूर देवस्थानच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, महिला अध्यक्षा शोभा पातारे, स्वाभिमानी संघटनेचे गणपत मोरे, बहुजन वंचित आघाडीचे विजयसिंह गायकवाड, संजय वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते संजय होडगर, कानिफ जगताप, सुमित पटारे, संदीप मोटे, सतीश तऱ्हाळ, गोरक्षनाथ काळे आणि शेकडो शनिभक्त सहभागी झाले होते.

. “या घोटाळ्यात देवस्थानचे काही कर्मचारी, पुजारी आणि अधिकारी सहभागी असून, त्यांनी देशभरातील शनिभक्तांची फसवणूक केली आहे. श्रद्धेला गालबोट लावणारा हा प्रकार असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे यांनी दिली.

 देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या नावाखाली काही कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजांच्या माध्यमातून, तसेच बनावट QR कोड आणि देणगी पावत्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून निधी खाजगी खात्यावर वळवला. या गंभीर प्रकरणात धर्मदाय उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, देवस्थान प्रशासनाने ट्रस्टचा ठराव, ॲपचा करारनामा व परवानगी यासंदर्भातील माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

 यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना निवेदन देण्यात आले असून, पुढील आठ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
34.8 ° C
34.8 °
34.8 °
40 %
9.2kmh
4 %
Mon
33 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!