सर्व समावेशक व सर्व समाज घटकातील कार्यकर्त्यांना दिले मानाचे स्थान
शेवगाव प्रतिनिधी
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, रवीजी अनासपुरे, आमदार मोनिकाताई राजळे व जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यातील बोधेगाव व शेवगाव मंडळाची जम्बो कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
- ******बोधेगाव भाजप मंडळामध्ये*********
अध्यक्षपदी संजय टाकळकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून शिवाजी समिंदर, आंबादास ढाकणे, संतोष केसभट, मयूर हुंडेकरी, केशव आंधळे व संभाजी कातकडे यांची नियुक्ती झाली. सरचिटणीस कैलास सोनवणे व बाळासाहेब डोंगरे, तर चिटणीस हनुमान बेळगे, मिराबाई उगले, अशोक बानाईत, मल्हारी लवांडे, तुकाराम थोरवे व राम गोरे यांची निवड झाली. कोषाध्यक्ष म्हणून दत्तात्रय तानवडे यांची नेमणूक झाली.
महिला आघाडी अध्यक्षा मंदाकिनी मुरकुटे, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर जायभाये, अनु. जाती मोर्चा अध्यक्ष शरद चाबुकस्वार, अनु. जमाती मोर्चा अध्यक्ष नारायण साबळे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष कासम शेख, शेतकरी मोर्चा अध्यक्ष उमेश धस, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र डमाळे, व्यापारी आघाडी प्रमुख सत्यनारायण मुंदडा, तसेच विविध सेल प्रमुखांमध्ये डॉ. निलेश मंत्री (वैद्यकीय), कार्तिक कमाणे (कायदा), सुभाष भवार (शिक्षक), गणेश थोरात (माजी सैनिक) यांचा समावेश आहे.
- ********?शेवगाव मंडळात*********
अध्यक्षपदी महेश फलके, उपाध्यक्ष महादेव पाटेकर, गणेश कोरडे, महादेव पवार, बाळासाहेब आव्हाड, बापू धनवडे व उषाताई कंगणकर यांची नियुक्ती झाली. सरचिटणीस सुभाष बरबडे, संजय वनवे तर चिटणीस शिवाजी पोटफोडे, ज्ञानेश्वर खांबट, किशोर गरंडवाल, ज्ञानेश्वर दिवटे, किरण पुरनाळे, आसाराम नर्हे यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी सोमनाथ आधाट यांची निवड झाली.
महिला आघाडी अध्यक्षा विद्या आधाट, युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सुपेकर, अनु. जाती मोर्चा अध्यक्ष शशिकांत खरात, शेतकरी मोर्चा अध्यक्ष संदीप वाणी, अल्पसंख्यांक मोर्चा जलील राजे, व्यापारी आघाडी संजय बाफना, तसेच अन्य आघाड्यांमध्येही विविध कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे.
या दोन्ही मंडळांमध्ये एकूण ४० कार्यकर्त्यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत असून, ही कार्यकारणी पक्ष संघटना बळकट करून आगामी निवडणुकांसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास मंडलाध्यक्ष संजय टाकळकर व महेश फलके यांनी व्यक्त केला.