नेवासाफाटा {गणेश झगरे याच कडून}
: नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मराठा सुकाणू समितीच्या व शिवसेना ठाकरे गटाचे वतीने दहावी ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश झगरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली.
सिद्धी दत्तात्रय बर्डे, प्रतीक रमेश कांगुणे, रोहित ज्ञानेश्वर बर्डे, प्रणाली मायकल साळवे, रितूज अरुण साळवे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राहुल जामदार, सचिन साळवे, अरुण साळवे, दत्तात्रेय बर्डे, दिव्या गणेश झगरे, प्रणाली साळवे, ऋतुजा साळवे, दीपक बर्डे, ज्ञानेश्वर बर्डे, रमेश साळवे, मच्छिंद्र पंडागळे, लक्ष्मण तुकाराम बर्डे, सचिन गायकवाड, मयूर साळवे, अमोल भागवत, दत्तात्रय हरिभाऊ बर्डे, संभाजी पोपटराव बर्डे, मनोज झगरे, आजिनाथ झगरे, आजिनाथ गोरक्षनाथ बर्डे, आजिनाथ जामदार यांसह मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते.