नेवासा
तालुक्यातील म्हसले येथे रस्ता रोको आंदोलन मराठा सुकानू समितीच्या वतीने व म्हसले व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले
यावेळी मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गणेश भाऊ झगरे म्हणाले की भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून मक्तापूर व म्हसले गोंडेगाव रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही या रस्त्यासाठी 3 कोटी निधी मंजूर असूनही काम अपूर्ण आहे व ठेकेदार उडवा उडवी ची उत्तरे देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करत आहे
या रस्त्यावर अपघात झाल्यास व कोणाची जीवित हानी झाल्यास या घटनेस सर्वस्वी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मराठा सुकाणू समितीचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ झगरे व उपस्थित ग्रामस्थ आसाराम गव्हाणे कृष्णा गव्हाणे बाबासाहेब गव्हाणे बाळासाहेब शिरसाट ज्ञानदेव गव्हाणे विठ्ठल राव सावंत विजय गव्हाणे शिवाजी गव्हाणे सुंदर बान मामा गव्हाणे यांनी केलीआहे