पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व आमदार विठ्ठलरावजी लंघे व नितीनभाऊ दिनकर यांची शिबिरास भेट
नेवासे
ललोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरतीय जनता पार्टी नेवासा शहर मंडलाच्या वतीने नेवासा शहरातील अहिल्यादेवी मंदिर प्रांगणात महारक्तदान शिबीर पार पडले या शिबीरास अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांनी भेट दिली.
भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे व नेवासा शहरातील प्रायमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ भाग्यश्री पवार यांच्या न्यु अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून झालेल्या या शिबिरामध्ये ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पालकमंत्री विखे यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत रक्तदानाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शुभेच्छा देण्याच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवींचे दर्शन घेतले यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व आमदार विठ्ठलरावजी लंघे व नितीनभाऊ दिनकर यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते रामचंद्रजी खंडाळे, उदयकुमार बल्लाळ, जयंत देवचक्के, डॉ बाळासाहेब कोलते, सचिनभाऊ देसरडा, प्रतापजी चिंधे, ऋषिकेशजी शेटे, भास्करराव कणगरे, डॉ लक्ष्मण खंडाळे, डॉ निर्मला सांगळे, डॉ मनिषा वाघ, अमृताताई नळकांडे, शोभाताई आलवणे, भारतीताई बेदरे, किशोर भांगे, बाळासाहेब पवार, डॉ निलेशजी लोखंडे, डॉ करणसिंह घुले, आदिनाथ पटारे, शिवाजी लष्करे, रामदास लष्करे, ओंकार जोशी, निखिल जोशी, रोहित लष्करे, दिनेश गुंजाळ, महेश पारखे, नानासाहेब डौले, श्रीकांत पारखे, अशोक कोळेकर, अर्जुन कर्डीले, सुधाकर शेंडे, निलेश शेंडे, दत्तात्रय लष्करे, गणेश चौगुले, महेश आघाडे, सचिन काळे, प्रशांत बहिरट आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.