spot_img
spot_img
HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गट...

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय व शाखेचे भव्य उद्घाटन


नेवासा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेचे व संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवार, ८ जून रोजी करण्यात आले. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान व महाराष्ट्र घरेलू कामगार महिला योजना नोंदणी यांचा शुभारंभ देखील संपन्न झाला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका अध्यक्ष अशोक मोरे, नेते वसंतराव कांगुणे आणि गणेश चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलपिंपळगाव शाखेची स्थापना करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र धिरडे, उपाध्यक्ष दिलीप लंघे, सचिव रवींद्र गटकळ, सरचिटणीस अनिल पुंड यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून बाबासाहेब भांड, विश्वनाथ कांगुणे, दत्तात्रय पुंड आदींनी जबाबदारी स्वीकारली असून युवक मोठ्या प्रमाणावर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

बेलपिंपळगावकर नागरिकांच्या वतीने अब्दुलभैय्या शेख यांचे तोफेच्या सलामीसह भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या सोबत कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मकरंद राजहंस, तालुका अध्यक्ष अशोक मोरे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप लष्करे, धनूभाऊ कणगरे, कामगार नेते भारत चौगुले, युवक काँग्रेसचे राहुल कांगुणे, भावी सरपंच किशोर गारुळे, माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले, दत्तात्रय राऊत, मुमताजभाई शेख, सरपंच कृष्णा शिंदे, अनिल पुंड, गणेश गारुळे, सुनील शिरसाठ, महेश आघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली ‘गावं तिथे राष्ट्रवादी’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा सन्मान आणि न्याय मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
— अशोक मोरे, तालुका अध्यक्ष, नेवासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश चौगुले सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भांड होते. वसंतराव कांगुणे आणि कार्लोस साठे सर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासा तालुका युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन वसंतराव कांगुणे यांनी केले.


सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन गावोगाव साजरा करण्यात येणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पक्ष ताकदीनं उभा राहील.”
— अब्दुलभैय्या शेख, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस



Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
29.5 ° C
29.5 °
29.5 °
63 %
9.1kmh
48 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!