इच्छामणी सिद्धिविनायक मंदिरासाठी दिली तीन लाख ११ हजाराची देणगी !
नेवासा(प्रतिनिधी)पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने अकोले येथील इच्छामणी सिद्धिविनायक मंदिरासाठी तीन लाख ११ हजाराची देणगी देण्यात आली., सदरची देणगी राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी दिल्ली येथील राष्ट्रीय पुरस्काराबद्दल उद्योजक प्रभाकरराव शिंदे यांचा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते गौरव करण्यात आला
उद्योजक प्रभाकरराव शिंदे यांना इंडस्ट्रीस एक्सलन्स अवॉर्ड -२०२५ द शुगर टेक्नॉलॉजिस्ट ऑफ इंडिया,नवी दिल्ली येथे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करत सत्काराद्वारे सन्मान करण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांतजी बहिरट,सुनिल गिते,अँड.बापूसाहेब दारकुंडे,सदीप टेमकर,संस्थान कार्यालयाचे महेंद्र फलटणे,चांगदेव अण्णा साबळे उपस्थित होते.