अनेक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका बदलत रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.
नेवासा | प्रतिनिधी
नेवासा तालुका व परिसरातील वंचित आघाडी तसेच आठवले गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली भूमिका बदलत रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला. हा सामूहिक प्रवेश कार्यक्रम रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात व युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष राहुलजी कानडे, अहिल्यानगर उत्तर युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, युवा जिल्हा महासचिव अमोल मकासरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात नवे प्रवेशकर्ते म्हणून –
सुनील बाकलीवाल (मा. सरपंच), राहुल पाटील (मा. सरपंच), संजय वाघमारे, नितीन मीरपगार, किशोर ताकवणे (सामाजिक कार्यकर्ते), राजेंद्र रायकर, बाबू भालेराव, पिंटू पारखे, संतोष भालेराव, सोमनाथ गायकवाड, नितीन चाबुकस्वार, दीपक पारखे, अमित पारखे, लखन साठे, किरण भालेराव, रोहित गायकवाड, गजानन गवारे, लखन गायकवाड, मनोज गायकवाड, मयूर भालेराव, बाळासाहेब पवार आदींचा समावेश होता.
याच वेळी अहिल्यानगर उत्तर युवा जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ साठे यांची अधिकृत निवड करण्यात आली. उपस्थित सर्वांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बळवत्तेसाठी संकल्प घेतला.
या प्रवेशामुळे नेवासा परिसरातील दलित व वंचित समाजात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचा विश्वास प्रदेश नेत्यांनी व्यक्त केला.