spot_img
spot_img
HomeUncategorizedशनि जयंती निमित्ताने दीड लाखाहून अधिक शनि भाविकांचे दर्शन

शनि जयंती निमित्ताने दीड लाखाहून अधिक शनि भाविकांचे दर्शन

सोनई* विजय खंडागळे याज कडून*

–सर्व शनि भक्ताचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनी जयंती उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. याप्रसंगी काशी आणि प्रवारासंगम इथून आणलेल्या पवित्र जलाने जल अभिषेक करण्यात आला. यावेळी कावडधारकांची सुंदर अशा बँड पथकासह भगव्या वसरासह शनिशिंगणापुरात मिरवणूक काढून शनि देवाच्या नामक घोषात तेल अभिषेक व जल अभिषेकाने शनि देवाला स्नान घालण्यात आले.यावेळी सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांची गर्दी केली होती.

सकाळची आरती गुजरातचे शनी भक्त पंकज कुमार, न्यायाधीश बी .वाय .जाधव यांच्या हस्ते, दुपारची आरती शनीभक्त सौरव बोरा , ऑस्ट्रेलियाचे शनी भक्त माता साहेब, दिल्लीचे प्रसाद प्रधान यांचे हस्ते ,तर सायंकाळी ची आरती पद्मश्री पोपटराव पवार ,ऑस्ट्रेलियाचे शनी भक्त राकेश कुमार, झीम बॉम्बे चे शनी भक्त जयेश शहा यांच्या हस्ते आरती करण्यात आली

. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोष नाई ,फुलांची सजावट, सुवासिक अगरबत्ती असे सुंदर असे नयन रम्य परिसर उजाळून निघत होता. मान्यवरांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बानकर , तांत्रिक अधिकारी उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे ,कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे ,राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील अँड .सयाराम बानकर ,माजी विश्वस्त सुरेश बनकर यांनी केले.

चौकट—- नेवासाचे आमदार विठ्ठल राव लंगे संगमनेरचे आमदार आमदार अमोल खताळ माजी आमदार स्नेहलते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, युवा कार्यकर्ते ऋषिकेश शेटे सचिन देसर्डा यांचा शनिदेवाला तेल अभिषेक चौकट–ऑस्ट्रेलियाचे शनि भक्त माता साहेब यांनी शनिशिंगणापूर येथील पाकशाळा प्रसादालय करिता आधुनिक स्वयंपाक ग्रहासाठी दीड कोटीची मदत यावेळी देऊन सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबुराव बानकर यांच्या शनी महात्म्य जीवन चरित्राचे प्राध्यापक बापूसाहेब देसाई लिखित ग्रंथ प्रकाशन होणार आहे.शनि रत्न पुरस्कार उद्या देणार-* श्री शेत्र पंढरपूर येथील अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराज काल दाखल झाले असून त्यांनी शनि देवाला रुद्र अभिषेक केला. उद्या त्यांना शनेश्वर देवस्थानच्या वतीने शनि रत्न पुरस्कार श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य ह भ प भास्करगिरी जी महाराज, माजी मंत्री शंकररावजी गडाख, पद्मश्री पोपटराव पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!