spot_img
spot_img
HomeUncategorizedशनी प्रदोष ,शनी जयंती मुळे शिंगणापूरला भक्ती भावाचा महापूर

शनी प्रदोष ,शनी जयंती मुळे शिंगणापूरला भक्ती भावाचा महापूर

भर पावसात भाविकांच्या गर्दीचा उच्चांक

सोनई *विजय खंडागळे याज कडून*

चौथा शनिवार सुट्टी, आज शनी प्रदोष, सोमवती अमावस्या ची शनी जयंती यामुळे श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथे काल अनेक भाविकांनी हजेरी लावून शनि देवाचे स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतले. या दिवसभरात लाखो भाविकांची नोंद झाली आहे.

शनि देवाला तेल अभिषेक करण्याची परंपरा असल्याने काल शनिवारी भक्तांनी शनिशिंगणापुरात दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. या दिवसभरासाठी शनिश्वर देवस्थान प्रशासनाने भाविकांसाठी सकाळी, दुपारी व सायंकाळी ची आरती ची सुविधा करण्यात आली होती, काही भाविकांनी चौथर्‍यावर जाऊन शनि मूर्तीचे पेड दर्शन घेतले . यामुळे उत्पन्न वाढत आहे.

तीन दिवसझाले पावसाच्या कमी अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या, एवढे असूनही श्री शेत्र शिंगणापुरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान शनिप्रसादाचे वाटपही मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती.

शनि भक्तांना त्रासदायक ठरणाऱ्या पोलीस ठाण्यासमोर असलेल्या लटकुचा बंदोबस्त करण्यासाठी शिंगणापूर पोलीस प्रशासन सज्ज तैनात केलेले होते. यापुढे भाविकांना कुणीही त्रास दिल्यास त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई चालू ठेवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी स्पष्ट केले.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!