110 विद्यार्थिनींनी घेतला सहभाग
नेवासा, प्रतिनिधी
“सध्याच्या काळात महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत असून अनेक नवीन संधींचा लाभ घेत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमताही तितकीच महत्त्वाची 78 पुढे जा, आदर्श घडवा आणि नेतृत्व स्वीकारा,” असे प्रतिपादन डॉ. क्षितिजभैया घुले पाटील यांनी केले. त
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ या अर्धदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यशाळेत एकूण ११० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यशाळेचे प्रमुख साधन व्यक्ती श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप पडघन यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना “महिलांनी सकस आहार घ्यावा, तसेच मायग्रेन, थायरॉईड, ॲनिमिया, सांधेदुखी, कॅन्सर यासारख्या आजारांची लक्षणे ओळखून वेळेवर तपासणी व उपचार करणे गरजेचे आहे. तसेच एच पी व्ही लस प्रत्येक स्त्रीने घ्यावी,” असे सांगितले.
नेवासा येथील विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. रुपाली नितीन मते (शेळके) यांनी महिलांच्या हक्क व कायद्याविषयी माहिती दिली. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह कायदा यासह शिक्षण, आरोग्य, समानता, वारसाहक्क, घरगुती हिंसाचार, मतदानाचे अधिकार इत्यादी मुलभूत हक्क विद्यार्थिनींना समजावून सांगितले. “कायद्याचा वापर तलवारीसारखा नव्हे तर ढालीसारखा करा,” हा सल्लाही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैभव लाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहिनी साठे यांनी तर आभार प्रा. मीना पोकळे यांनी मानले. प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ. नारायण म्हस्के, डॉ. सिंधुताई पडघन, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, प्रा. सरिता नवथर, प्रा. केशव चेके उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अनुराधा बोठे, प्रा. किरण निकम, प्रा. मनीषा कातोरे, प्रा. राणी दोंदे, प्रा. तेजल सोनवणे व श्री. सागर भागवत यांनी विशेष प्रयत्न केले.