नेवासा
पाच वर्षापासून पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष
प
सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील भौतिक असुविदेबाबत गेल्या पाच वर्षांपूर्वी उपोषण केले होते परंतु अद्यापही सदरचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.
या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्याच्या नंतर आज दिनांक23 जून रोजी नेवासाची गटविकास अधिकारी संजय लाखवाणी यांनी भेट देऊन शाळेच्या आवारातील भौतिक असुविधांची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाला काम करण्यासंदर्भात सूचना केल्या.
परंतु पुरेसा निधी नसल्यामुळे संबंधित काम तातडीने होऊ शकत नाही अशी माहिती ग्राम विकास अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिली.
लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असणारे शिक्षण आणि आरोग्य यासाठी जर निधी नसेल तर अशा लोकशाही व्यवस्थेचा उपयोग काय अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली.
यावर उत्तर देताना लवकरात लवकर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देऊ असे पुढारी आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले सदरचे काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संभाजी शिंदे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली.
शाळेचा परिसर असा झालेला आहे की या ठिकाणी कधीही विद्यार्थ्यांचा अपघात होऊ
शकतो ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेऊन या ठिकाणी भराव करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने व पालकांच्या वतीने करण्यात येत आहे.
या भय्या वह अवस्थेमध्ये शाळेच्या परिसरात अनेक वेळा विषारी सर्प आढळून आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका आहे ही गोष्ट शासनाने लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करावी.
चौकट -विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कुठलाही अपघात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची असेल -सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे.