पी.एम. किसान उत्सवात दिली शेतकरी हिताच्या योजनांची माहिती
“
नेवासे
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जागृतपणे प्रयत्न करून शासनदरबारी सातत्याने आवाज उठवू,” असे आश्वासन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिले. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित पी.एम. किसान सन्मान निधी उत्सवात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विसाव्या हप्त्याचे वितरण ऑनलाईन थेट प्रक्षेपणाद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.
कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी जमिनीच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तर कृषिभूषण पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी मोहनराव तुवर यांनी सेंद्रिय शेतीची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी सुहास धस, दत्तू पोटे, सरपंच विनोद ढोकणे, प्रगतशील शेतकरी हरिभाऊ ढगे, पांडुरंग लंघे, सुनील बापू पाटील, विवेक भैय्या, कृषी खातेचे प्रशांत पाटील, कृषी सहाय्यक दांडगे, संजय गायकवाड, फाटके व इतर अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक ज्ञानदेव आहेर यांनी केले.