नेवासा (प्रतिनिधी) —
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, जैविक व सेंद्रिय शेती, उत्पादनवाढीचे उपाय आणि नवीन AI तंत्रज्ञान यावरील मार्गदर्शनासाठी ‘शेतकरी परिसंवाद व मेळावा’ येत्या सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि., पो. भेंडें, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. सुरेश माने (ऊस पीक विशेषज्ञ, सांगली) हे मार्गदर्शन करणार आहेत.तर
प्रमुख अतिथी म्हणून गुरुवर्य ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर),मा.आ. श्री. नरेंद्र घुले पाटील (चेअरमन, लोकनेते मारुत राव घुले पाटील साखर कारखाना लि.),.श्री. चंद्रशेखर घुले पाटील (व्हा. चेअरमन), मा.आमदार. पांडुरंग अभंग (विश्वस्त, ज्ञानेश्वर मंदिर संस्थान)
अनिल शेवाळे कार्यकारी संचालक व इतर संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बु. , नेवासा-सुरेगाव(गंगा) रोड, ता. नेवासा. येथे शेतकऱ्यांनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे